🕒 1 min read
मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.
कालपासून बॉलीवूड मध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. काल बॉलीवूड मधील खिलाडी कुमार अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर गोविंदाला देखील कोरोनाची लागण झाली. आज अक्षय कुमारची तब्बेत खालावली असल्याने त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. अक्षय नंतर राम सेतू सेटवरील ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले.
https://www.instagram.com/p/CNRh9RupynV/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान बॉलिवूडचा यंग अभिनेता विकी कौशलला कोरोनची लागण झाल्याचे समजले आहे. याची माहिती स्वतः विकीने इंस्टाग्रामवरून दिली आहे. विकीने पोस्ट मध्ये लिहिले, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यावरती उपचार चालू आहेत दरम्यान माझ्या संपर्कात जे लोक आले त्यांनी आपली टेस्ट करून घ्यावी. असे आवाहन देखील विकीने केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- उपचारात हलगर्जीपणा केल्यास खैर नाही, आ. मेघना बोर्डीकर यांचा सज्जड इशारा
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या,मुंबई उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
