Share

हा विजय हक्काचा तरीही आमच्यासाठी स्पेशलच-चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक झाली. या दोन्ही निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. नागपूर मध्ये भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली तर अकोला वाशिम बुलडाणा विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आमचे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद निवडणुकीत नागपूर स्थानिक प्राधिकरणातून मिळवलेला विजय अपेक्षितच होता. महाविकास आघाडीने जंग-जंग पछाडले, काँग्रेसने आयत्या वेळी उमेदवारही बदलून झाला; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हा विजय हक्काचा तरीही आमच्यासाठी स्पेशलच आहे!, असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!