मुंबई: नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता कॉंग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते सडकून टीका करत आहेत. त्याच सोबत कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर चांगलाच निशाणा साधला जात आहे.
महाविकास आघाडीच्या या पराभवानंतर भाजप नेते टीका करत आहेत. मात्र यावर आता कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांचा पराभव का झाला याचे कारण देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी टीका करत म्हणलं होतं की कॉंग्रेस स्वतःचे मत राखू शकले नाही ते उद्या राज्याचे काय नेतृत्व करणार, यावर अतुल लोंढे म्हणाले, प्रवीण दरेकर एकीकडे बोलतात की, नागपूर विधानपरिषद निवडणुकीत नाना पटोले यांचा कारभार एककल्ली होता. दुसरीकडे ते दबावाला बळी पडल्याचे सांगतात. प्रवीण दरेकर डोक्यावर पडल्यासारखी परस्परविरोधी विधाने करत आहेत.
पुढे बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, या दोन्ही निवडणुका जनतेच्या प्रश्नांवर झाल्या नव्हत्या. तरीही आम्ही पराभव मान्य करतो. मात्र, जनतेच्या प्रश्नावर निवडणूक होते तेव्हा भाजपचा पराभव होतो, याकडे अतुल लोंढे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अतुल लोंढे मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते, यावेळी त्यांनी असा अजब दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- काँग्रेस पक्षाला स्वत:ची मतं राखता आली नाहीत, ते उद्या राज्याचं नेतृत्त्व काय करणार – प्रवीण दरेकर
- विधान परिषदेच्या दोन्ही जागांवर भाजपाचा विजय; ‘मविआ’ला मोठा फटका
- नाव गांधीचे सांगायचे पण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना…- केशव उपाध्ये
- वाहतूक नियम पाळा! अन्यथा..; आजपासून नवे नियम लागू
- अकोल्यात शिवसेनेचा पराभव, भाजपाचे वसंत खंडेलवाल विजयी

