Share

कर्नाटकात मराठी भाषिक नेत्यावर शाई फेकल्याप्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बेळगावमध्ये महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी(Deepak Dalavi) यांच्या अंगावर शाई फेकल्याने येथील मराठी जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगावात कन्नड भाषकांची अरेरावी पुन्हा दिसून आली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दिपक दळवी यांच्यावर ज्याप्रकारचा हल्ला झाला त्याचा फक्त महाराष्ट्र सरकारने निषेध करुन चालणार नाही. सातत्याने तिथे मराठी बांधवांवर, समितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतात. आम्ही इथून फक्त निषेधाचे खलिते पाठवतो. सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निषेध व्यक्त केला आहे. जे दोन मंत्री सीमाप्रश्नासाठी खास नेमलेले आहेत त्यांनी बेळगावला जावून समितीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

या घटनेला जबाबदार बेळगावची मराठी जनता सुद्धा आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी एकजूट दाखवली नाही. भाजपला विजयी केले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत केले. त्यामुळे महाराष्ट्र व्देष्ट्यांचे बळ वाढले आणि त्यातून असे हल्ले सुरु झाले आहेत. हा बेळगावसह सीमाभागातल्या मराठी माणसाला धडा आहे. कालची घटना महाराष्ट्रासाठी वेदनादायक आहे. महाराष्ट्र सरकारने त्याविषयी कठोर पावले उचलायला हवीत, असे संजय राऊत यांनी म्हणाले आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे सीमाभागात संताप व्यक्त केला जात असून या घटनेच्या निषेधार्थ मराठी भाषकांच्या वतीने मंगळवारी बेळगाव बंदचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे सुरू झाले आहे. त्याला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या ठिकाणी कन्नड वेदिका रक्षण समितीचे काही कार्यकर्ते आले. त्यांनी एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांना चर्चा करायचे असल्याचे सांगून बाजूला नेले. तेथे त्यांच्यावर शाई फेकून ते पळून गेले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!