Share

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला धक्का, सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले

Published On: 

🕒 1 min read

बेळगाव : कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंग पावल्याचं स्पष्ट दिसत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा गेले अनेक वर्षे सुरु असून कर्नाटकात असलेल्या मराठी भाषिकांना दडपशाहीला सामोरं जावं लागल्याचं अनेकदा समोर आलं आहे. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात व्हावा अशी मागणी मराठी भाषिकांची असून ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्फत लढा देत आहेत. बेळगावमधील मराठी बांधवांना होणारा त्रास कमी होण्यासाठी या समितीला अधिक जागांवर यश मिळणे गरजेचे होते. मात्र केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

यंदा पक्षीय पातळीवर लढवण्यात आली होती.यात भाजपला ५८ पैकी ३६ जागांवर दणदणीत विजय मिळवत सत्तास्थापनेचा पल्ला पार केला आहे. तर काँग्रेसच्या खात्यात १० जागा, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि उर्वरीत जागांवर अपक्षांनी विजय मिळवला.

बेळगाव महानगरपालिकेच्या निकालामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चार शिलेदारांनी विजय मिळवला. वैशाली भातकांडे, शिवाजी मांडोळकर, रवी साळुंके आणि बसवराज मोदगेकर हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झाले. वैशाली भातकांडे यांनी प्रभाग क्रमांक १० मधून विजय मिळवला. तर शिवाजी मांडोळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून वियज मिळवला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे रवी साळुंके यांनी प्रभाग क्रमांक २७ मधून विजय मिळवला. तर बसवराज मोदगेकर यांनी प्रभाग क्रमांक ४८ मधून विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!