नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केल्याने काँग्रेसनेते अशोक चव्हाणांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन अभिनंदन केले आहे. असे ट्विट अशोक चव्हाणांनी केले आहे.
नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली. काल सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत ६५ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी देगलूरच्या विजयानंतर दूरध्वनी करून विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर व सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दुपारीच शुभेच्छा दिल्या होत्या. तीनही नेत्यांचा मी आभारी आहे.
— Ashok Chavan (@AshokChavan1958) November 2, 2021
काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर बिलोली पोटनिडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि भाजपच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे सुभाष साबणे यांना त्यासाठीच उमेदवारी देत जिंकण्याची आस बांधली होती. भाजपात प्रवेशानंतर सुभाष साबणे यांनी अशोक चव्हाणांना ‘विलन’ सिद्ध करण्याचेही प्रयत्न केले. मात्र चव्हाणांनी तेही फोल ठरवले.
अशोक चव्हाण यांनी प्रचारासाठी तब्बल महिनाभर नांदेडमध्ये तळ ठोकला होता. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील भाजप नेत्यांची फौज देगलूरमध्ये उभी केली होती. मात्र, काँग्रेस उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंना पराभूत करत काँग्रेसची ताकद पुन्हा सिद्ध केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

