मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलेच द्वंद्व रंगले आहे. मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर आल्याचे देखील पाहायला मिळत असताना भाजपची गांधीगिरी समोर येत आहे. आता देशाचा यंदाचा स्वातंत्र्यदिन हिरक की अमृतमहोत्सव यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गोंधळ झाला. त्यानंतर आता देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी भाजप 75 हजार पत्र पाठवणार आहे.
कालपासून अमरावती शहरातून या अभियानाची सुरुवातही झाली आहे.देश कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय याची आठवण मुख्यमंत्र्यांना नसल्याचा आरोप भाजपने याआधी केला. आता त्यानंतर भाजप पत्र लिहून ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करुण देणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा उद्धव ठाकरे यांना 75 हजार पत्र लिहिणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष की हीरक महोत्सवी वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच माहीत नाही हे राज्याचं दुर्दैव आहे.राज्यातील युवांच्या तर आता कोणत्याच अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून उरलेल्या नाही.किमान देशाचे अमृत महोत्सवी वर्ष तरी निष्क्रिय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहवे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75000 पत्र पाठवणार आहे.याची सुरुवात अमरावती शहर येथे करण्यात आली अशी माहिती भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- ब्रिटनचा ‘तो’ इशारा खरा ठरला; काबूल विमानतळावर मोठा बॉम्बस्फोट
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील लागू होणार अनुकंपा धोरण
- पुणे शहरात कोरोना सक्रिय रुग्णांमध्ये आजही वाढ; तर ४ रुग्णांचा मृत्यू
- ‘मुका मोर्चा म्हणाला तेव्हा संजय राऊत तुम्ही गांजाची की अफूची गोळी घेतली होती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
