Share

शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका; हरियाणात दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका हातच्या गेल्या

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या कृषी आंदोलनाचा मोठा धक्का भाजपला हरियाणात बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप-जेजेपी आघाडीला हरियाणातील जनतेनं नाकारलं आहे.

भाजपने दोन महापालिका आणि तीन नगरपरिषदा गमावल्या आहेत. सोनीपत, अंबाला आणि पंचकुला या तीन महापालिकांच्या निवडणुका झाल्या.महापौरांची थेट जनतेतून निवड पहिल्यांदाच झाली. सोनीपत आणि अंबालामध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे.

अंबाला, पंचपूला, सोनीपत या तीन महापालिकांबरोबरच धरुहेरा, सांपला, रेवडी आणि उकालना या नगरपरिषदांसाठीच्या निवडणुकाही महत्त्वपूर्ण होत्या. नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्षांनी बाजी मारली आहे.दरम्यान,पंचकुला नगरपरिषदेमध्ये भाजपाचे कुलभूषण गोयल यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी काँग्रेसचे उपिंदर अहलुवालिया यांना पराभूत केले.

उकलानामध्ये अपक्ष उमेदवार सुशील साहू यांनी भाजपाचे उमेदवार महेंद्र सोनी यांना पाडले आहे. सांपला नगरपालिकेत भाजपाच्या उमेदवार सोनू यांना अपक्ष उमेदवार पुजा यांनी मोठ्या मतफरकाने हरविले आहे. महत्वाचे म्हणजे पूजा या काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत. परंतू काँग्रेस याठिकाणी पक्षाच्या चिन्हावर लढली नव्हती. त्यामुळे पूजा या अपक्ष ठरल्या होत्या. धारुहेडामध्येही अपक्ष उमेदवार कंवर सिंह जिंकले आहेत.

अंबालामध्ये शक्ती राणी जिंकल्या आहेत. त्यांनी भाजपाच्या उमेदवार डॉ. वंदना शर्मा यांना हरविले आहे. सोनीपतमध्ये काँग्रेसचे उमेदवार निखिल मदान यांनी भाजपाच्या लिलत बत्रा यांना 13818 मताधिक्याने हरविले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!