🕒 1 min read
कोल्हापूर : राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिताही लागू झाली आहे. तर, काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपली असून सर्व उमेदवारांची मुख्य लढत आता स्पष्ट झाली आहे.
मुख्य लढत आता स्पष्ट झाल्यामुळे प्रचाराची धुमशान सुरु झाली आहे. गावागावांत प्रचाराचा धुरळा उडाला असून कोल्हापूरमधील एक ग्रामपंचायत भलतीच चर्चेचा विषय बनली आहे. याचं कारण देखील खास आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिवसेनेची मैत्री तोडत भाजपला साथ दिली आहे. अर्थात महाविकास आघाडी ही स्थानिक पातळीवर तुटली असली तरी भाजपसोबत हात मिळवणी करून शिवसेनेच्या गटाला रोखल्यामुळे भविष्यातील राजकीय उलथापालथीची ही नांदी आहे का? अशा चर्चांना देखील उधाण आहे.
याचं आणखी एक खास कारण म्हणजे हे गाव खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांचं आहे. शिवसेनेसोबत मैत्री तुटल्यानंतर किती दुरावा या दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झाला आहे हे आरोप-प्रत्यारोपांवर दिसून येत असतानाच स्थानिक पातळीवर देखील हे दिसून आलं आहे. भुदरगड तालुक्यातील खानापूर या गावात सद्या भाजपचेच सत्ता आहे. या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेला रोखण्यासाठी थेट राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मैत्रीचा हात दिला आहे. यामुळे या निवडणुकांमध्ये थेट पक्षाचा सहभाग नसला तरी पुरस्कृत गटांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- कौतुक तर होणारचं ! आजारी असलेल्या माजी कर्मचाऱ्याची भेट घेण्यासाठी टाटांनी थेट गाठलं पुणे
- शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे; फडणवीसांची बोचरी टीका
- ऍमेझॉन प्रशासन न्यायालयातही झुकलं; मराठी वादात घेतली ‘मनसे’ माघार !
- ‘तमाम गुजरातीद्वेष्ट्या शेणकिड्यांना, त्यांच्या मालकाकडून सप्रेम जलेबी-फाफडा !’
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
