🕒 1 min read
मुंबई : ‘मराठी नाही तर ऍमेझॉन नाही’, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ऍमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर ऍमेझॉननं माघार घेत मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबर रोजी आक्रमक पवित्रा घेत खळखट्याक पॅटर्न वापरलं होतं.
तर, याच प्रकरणी ऍमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ऍमेझॉनने दिंडोशी न्यायालयात धाव घेत, ‘मनसेपासून कंपनीला व कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे,’ अशी विनंती केली होती. यानंतर, न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या प्रमुख नेत्यांना देखील नोटीस बजावली होती.
राज ठाकरे यांना कोर्टाने समक्ष हजर राहण्यास देखील सांगितले होते. यामुळे मनसे अधिक आक्रमक झाली. परिणामी पुण्यातील कोंढव्यातील ऍमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं. यानंतर, औरंगाबाद पाठोपाठ मुंबई देखील अनेक ठिकाणी ऍमेझॉन वेअर हाऊसवर हल्लाबोल केला होता. हा आक्रोश बघता ऍमेझॉनने आपली मुत्सद्देगिरी थांबवून नमतं घेतलं. त्यांनी त्याच रात्री आपली सेवा लवकरच मराठी मध्ये येत असल्याचा वेबसाईटवर खुलासा केला होता.
दरम्यान, मनसेची मराठीबाबतची मागणी मान्य करताना मनसेविरोधातील दावा मागे घेण्यासाठी ॲमेझॉनतर्फे आज दिंडोशी दिवाणी कोर्टात अर्ज करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्याविरोधात आता कोणतीही तक्रार नसल्याचे ॲमेझॉनचे म्हणणे असून १२ जानेवारी रोजी कोर्टात या अर्जावर पुढची सुनावणी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- कौतुक तर होणारचं ! आजारी असलेल्या माजी कर्मचाऱ्याची भेट घेण्यासाठी टाटांनी थेट गाठलं पुणे
- शिवसेना म्हणजे नौटंकी सेना आहे; फडणवीसांची बोचरी टीका
- अखेर प्रतीक्षा संपली, कोरोना लसीकरणाचा मुहूर्त ठरला !
- ‘तमाम गुजरातीद्वेष्ट्या शेणकिड्यांना, त्यांच्या मालकाकडून सप्रेम जलेबी-फाफडा !’
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
