पुणे : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा हे त्यांच्या दानशूर व्यक्तिमत्वामुळे कायमच चर्चेत असतात. कोरोना काळात देखील त्यांनी देशासाठी भरभरून मदत केली. देशाबद्दल जे जे काही करता येईल त्यासाठी ते पुढाकार घेत असतात. टाटा सन्स आज अनेक क्षेत्रात अग्रस्थानी आहे. टाटा समूहाच्या सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी तत्पर व योग्य वर्तणूक देत असल्याचे अनेक वेळा दिसून आलं आहे.
रतन टाटा हे अनेक वेळा पुण्यासह देशभरातील इतर उत्पादक प्लांट्सला भेट देत असतात. यावेळी ते मॅनेजर ते सामान्य वर्कर कोणाच्यातही भेदभाव न करता सामील होत असल्याचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. आता अशाच एका घटनेमुळे रतन टाटा यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
८३ वर्षीय रतन टाटा यांच्या माणुसकीचा अनुभव पुण्यातील माजी कर्मचाऱ्याला आला आहे. हा माजी कर्मचारी आजारी असल्याचं समजत असून त्यांची विचारपूस खुद्द रतन टाटा यांनी त्यांची भेट घेऊन केली आहे. मागील दोन वर्षांपासून अस्वस्थ असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी ८३ वर्षीय रतन टाटा मुंबई ते पुणे प्रवास करून फ्रेंड्स सोसायटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत ना बाउन्सर होते ना सुरक्षारक्षक वा ताफा ! अत्यंत साधेपणाने या माजी कर्मचाऱ्यांची त्यांनी भेट घेतली.
या खासगी भेटीचा कोणत्याही प्रकारे प्रचार केला गेला नाही, आणि तेथे कोणतेही माध्यम नव्हते. त्यांच्या या भेटीचा एक फोटो व्हायरल झाला आणि सर्वच क्षेत्रातून पुन्हा एकदा टाटांचं कौतुक केलं गेलं. LinkedIn वर एकाने त्यांच्या भेटीची पोस्ट केली होती. आजच्या काळात कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक बड्या कंपन्या देखील योग्य वागणूक देत नाहीत. मात्र, एका माजी कर्मचाऱ्यांची विचारपूस करण्यासाठी रतन टाटांनी घेतलेली ही भेट आदर्श निर्माण करणारी आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता ते भविष्यात मुस्लिमांचाही मेळावा घेतील, बिचाऱ्या शिवसेनेवर संगतीचा परिणाम; दानवेंचा टोला
- संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या थोरातांच्या घरी मनसे पाठवणार 10,000 पोस्टकार्ड
- अखेर प्रतीक्षा संपली, कोरोना लसीकरणाचा मुहूर्त ठरला !
- सीरम विरुद्ध भारत बायोटेक : अखेर कोरोना लस उत्पादक कंपन्यांमधील वादावर पडदा
- संजय राऊत भाजपला सुरुंग लावण्याच्या तयारीत; राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा


