Share

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला; अशोक चव्हाणांची भाजपवर टीका!

Published On: 

मुंबई:- धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल यांनी आपला दबदबा सिद्ध केला आहे. अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. दरम्यान, पटेल यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला आहे.

काँग्रेसला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेणाऱ्या अमरीश पटेल यांचा विजय काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपने मिळवलेला विजय हा दुसर्‍याच्या घरात चोरी करून मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं असाच प्रकार भाजप करत आहे. भाजपने ही चोरी केली आहे. आम्हाला ५ जागांपैकी अनेक जागा मिळतील. तसेच आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्षे टिकेल, असे अशोक चव्हाण म्हणाले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणुकीत अमरीश पटेल यांच्या काँग्रेस सोडल्याने झालेल्या नुकसानाची कबुली दिली. ते म्हणाले, “धुळ्यात अमरीश पटेल यांचे संबंध लोकांशी चांगले होते. ते पूर्वी काँग्रेसमध्येच होते. अमरीश पटेल सोडून गेल्याने त्यांच्याबरोबर काही लोक गेले होते. त्यामुळे मतं फुटलेला आकडा मोठा वाटतोय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!