नवी दिल्ली- मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.मराठा आरक्षणाच्या विषयावर राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप मराठा मोर्चा समन्वयकांकडून होत आहे.दरम्यान, हे सर्व एका बाजूला सुरु असतान तिकडे दुसऱ्या बाजूला आज माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांची भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर अनेक विषयावर चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील पेटलेला मराठा आरक्षणाचा विषय यावर चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही परखड भूमिका मांडली.आज मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक खूप मोठे नुकसान होत आहे नोकऱ्यांचा प्रश्न जटिल बनत चालला आहे .मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे समाजातील युवक नोकरी व शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आड कोणी येऊ नये .मराठा आरक्षणाच्या विरोधात प्रति मोर्चे काढणाऱ्यांनी मराठा समाज हा इतर समाजाचा आरक्षण वगळून आरक्षण मागत नाही. याउलट समाजातील सर्व नेतेमंडळींनी आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे तरी या बाबत राज्यपाल महोदयांनी लक्ष घालावे अशी मागणी निंबाळकर यांनी केली.
याशिवाय महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना लाईट बिलाच्या बाबत दिलेला शब्द पाळावा लोकांना भरमसाठ लाईट बिल आलेली आहेत. लॉकडाऊन मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असताना लोकांना लाईट बिल भरणे सुद्धा शक्य नाही. तरी या बाबत राज्य शासनाला आपण सूचना देऊन सरसकट लाईट बिल माफी द्यावी अशीही मागणी केली. यावेळी राज्यपाल यांनी वरील दोन्ही विषयांमध्ये लक्ष घातले जाईल असे आश्वासन यावेळी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
‘शेतकऱ्यांना पुढे करुन चीन-पाकिस्तानला देशामध्ये अस्थिरता निर्माण करायची आहे’
कोरोना महामारीचे संकट समूळ नष्ट कर; मुश्रीफांची साईबाबांच्या चरणी प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

