मुंबई:- धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल यांनी आपला दबदबा सिद्ध केला आहे. अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. दरम्यान, पटेल यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला आहे.
काँग्रेसला रामराम करत भाजपचे कमळ हाती घेणाऱ्या अमरीश पटेल यांचा विजय काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपने मिळवलेला विजय हा दुसर्याच्या घरात चोरी करून मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं असाच प्रकार भाजप करत आहे. भाजपने ही चोरी केली आहे. आम्हाला ५ जागांपैकी अनेक जागा मिळतील. तसेच आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्षे टिकेल, असे अशोक चव्हाण म्हणाले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणुकीत अमरीश पटेल यांच्या काँग्रेस सोडल्याने झालेल्या नुकसानाची कबुली दिली. ते म्हणाले, “धुळ्यात अमरीश पटेल यांचे संबंध लोकांशी चांगले होते. ते पूर्वी काँग्रेसमध्येच होते. अमरीश पटेल सोडून गेल्याने त्यांच्याबरोबर काही लोक गेले होते. त्यामुळे मतं फुटलेला आकडा मोठा वाटतोय.
महत्वाच्या बातम्या
सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!
धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन महाविकास आघाडीचे भविष्य काय असेल हे स्पष्ट झाले : प्रवीण दरेकर
पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची पण गरज नाही पडणार – खडसे
2022 सालापर्यंत गोव्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री
वीजबिल आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी खा.नाईक निंबाळकरांनी घेतली राज्यपालांची भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

