करमाळा : लोकांना सैराट बद्दल जितकं कुतूहल वाटतं, तेवढंच करमाळा परिसर आणि बिटरगाव बद्दल सुद्धा. सैराटने महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुसता सैराट हा शब्द उच्चारला तरी आर्ची, परश्या यांच्यासोबत आठवतं ते ‘बिटरगाव’ !
सैराटच्या चित्रीकरणामुळे बिटरगाव, करमाळा आणि सोलापूर परिसर हा चर्चेचा मुद्दा बनला होता. तेच बिटरगाव पुन्हा चर्चेत आले आहे. निमित्त आहे, यंदाची सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक !
करमाळा तालुक्यात एकूण ४९ गावात निवडणुकांचे बिगुल वाजले होते. तिथे भाजप पूर्ण ताकदीने लढल्यामुळे इतर पक्षांना निवडणूक जड गेल्याचे पाहायला मिळते. करमाळा तालुक्यातील बिटरगाव हे ही त्याला अपवाद नाही. स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीही झाला. ग्रामपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून करमाळा भाजपने बिटरगावात यशस्वी एन्ट्री केली आहे.
बिटरगाव मध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवून भाजपचा झेंडा फडकवला आहे. संपूर्ण करमाळा तालुक्यात भाजपने बाजी मारूली आहे. एकूणच निवडून आलेल्या उमेदवाराची आकडेवारी पाहता करमाळा परिसरात भाजप तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले असल्याचे दिसून येते. ४९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४१ जागेवर भाजपला विजय मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंवरील संकट दूर होण्यासाठी नगरसेवकाचे तब्बल दोन किलोमीटरपर्यंत दंडव
- ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण ! पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं भारतीय संघाचं अभिनंदन
- ‘हा नवा भारत आहे, घरात घुसून मारतो’
- धडाकेबाज खेळीने पंतने केली टीकाकारांची बोलती बंद
- आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो; भाजपने केला तब्बल ६ हजार ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा


