Share

‘संपाच्या माध्यमातून भाजपला राज्य सरकारच्या विरोधी वातावरण तयार करायचंय’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. तर परिवहन मंत्री अनिल परब वारंवार कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत आहेत.

तर दुसरीकडे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली आहे. ‘आजपर्यंत सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने त्यांच्या संघटना करायच्या तेव्हा कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नव्हता. प्रत्येक पक्षाने या मर्यादा पाळल्या होत्या, पण भाजपला येनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण तयार करायचं आहे हे त्यासाठी सुरू आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना जास्त उत्सुक नाही म्हटल्यावर भाजपवाल्यांनी पुढे येऊन आंदोलन सुरू केलेय. एसटीचे कर्मचारी आमचेच आहेत, त्यांचे प्रश्न सोडविण्याची इच्छा सरकारची आहे, आमची सहानुभूती आहे. पण, भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसणं, दंगा करणं, अर्वाच्च भाषेत बोलणं हे सुरू आहे. एखादं आंदोलन राजकीय सुरू झालं की त्याला राजकीय भाषेतच उत्तर द्यावं लागते. अनिल परब यांनी संघटनांशी चर्चा केलीय, त्यांनी अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागं घेण्याचं आवाहनही केलंय. प्रश्न सुटावे अशीच आमची इच्छा असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!