Share

काँग्रेसच्या बलिदानाचा इतिहास भाजपकडून पुसण्याचा प्रयत्न, आ. प्रणिती शिंदेंचा विरोधकांवर निशाणा!

Published On: 

औरंगाबाद : केंद्रातील मोदी सरकारला स्वातंत्र्याचा इतिहास माहीत नाही. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्या पाठीमागे फक्त आणि फक्त काँग्रेस आहे. स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसचे मोठे बलिदान आहे. मात्र हा सर्व इतिहास भाजप पुसून टाकायला निघाले आहे. त्यामुळे आता देशात बळकटीकरणासाठी आणि एकात्मतेसाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

गांधी भवन या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. विधिमंडळ अनुसूचित जाती समितीच्या अध्यक्षा या नात्याने त्या मंगळवारी सकाळी शहरात दाखल झाल्या. बैठकांना उपस्थित झाल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी वेळ काढला. उंटावरून शेळ्या हाकणे ही काँग्रेसचे संस्कृती नसून भाजपची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र येणाऱ्या काळात ही कामे कशाप्रकारे होतील यासाठी पक्ष प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, यांनी भाजपला आवरण्याची गरज असल्याचे सांगितले. आमदार लहू कानडे म्हणाले काँग्रेससमोर अनेक लोकांनी आव्हाने निर्माण केली आहेत अराजकतेचा उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला नेहरूंची गरज आहे. लोकांच्या मनातून काँग्रेस गेलेली नाही. हे लक्षात घ्या असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!