सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ता खेचून आणली आहे. राजकीय नाट्यानंतर याठिकाणी राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमामुळे भाजपला सत्ता गमवावी लागली.
सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेत ७८ जागा असून यामध्ये पक्षीय बलाबल भाजप – ४१, अपक्ष – २, काँग्रेस – २० राष्ट्रवादी-१५ असे होते.मात्र, राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सुर्यवंशी यांचा ३ मतांनी पराभव केला. भाजपची सहा मते फोडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला यश आले. तर दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता.
भाजपच्या सहा नगरसेवकांनी व्हीप डावलून काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान केल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार ? याबाबत शहरात चर्चा रंगल्या होत्या. सांगलीचे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे आणि महापालिका गटनेते सुधीर सिंहासने यांनी सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाई करण्यासाठी हालचाली देखील सुरु केल्या आहेत. तर, महापौर निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करणाऱ्या सहा भाजप नगरसेवकांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील बेरोजगारीला मोदी सरकारचा ‘तो’ निर्णयच जबाबदार; मनमोहन सिंगांनी मोदींना फटकारलं
- सायबर अटॅक हा तांत्रिक विषय, बावनकुळेंना समजणार नाही : अनिल देशमुख
- आ.प्रशांत बंब हे गंगापूरचे विजय मल्ल्या-कृष्णा पाटील डोणगावकर
- राज्य सरकार डॉक्टरांचा सल्ला घेतंय की कंपाऊंडरचा ? फडणवीस कडाडले
- कोरोना काळात गरीब भिकेला लागले, अन् धनदांडगे अब्जाधीश झाले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

