Share

राज्य सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ फेब्रुवारी रोजी राज्यभर धरणे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  महाआघाडी सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगितले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रवक्ते गणेश हाके , विश्वास पाठक आदी या प्रसंगी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी या वेळी राज्य परिषदेच्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. या परिषदेत राज्य सरकारच्या विरोधात २२ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र २२ फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार असल्याने आंदोलन कार्यक्रम २५ रोजी करण्याचे ठरविण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. महाआघाडी सरकार विसंवादाने कोसळेल, हे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळले तर भाजपा सरकार स्थापण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!