Share

भाजपाचे सोलापूर शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा शहराध्यक्षपदाला रामराम !

Published On: 

सोलापूर : सोलापूर शहरातील गटबाजीला कंटाळून भाजपचे शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी यांनी राजीनामा दिला आहे. जानेवारी २०१६ मध्ये प्रा. अशोक निंबर्गी यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. मुदत संपल्याचे कारण दिला असला तरीही गटबाजीला कंटाळून निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. निवडणूक निकालाला एक महिना होत नाही तोच प्रा. अशोक निंबर्गी यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यापूर्वीच प्रा. निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याने सहकारमंत्री गटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान,सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. अशोक निंबर्गी यांनी दहा जून रोजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दानवे यांनी राजीनामा स्वीकारलेला नाही. मात्र यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!