🕒 1 min read
बीरभूम:- पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण चांगलेच तापवले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने खास रणनीती तयार केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून त्यापैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलं आहे.
दरम्यान आता पश्चिम बंगालमध्ये भाजपने केवळ ३० जागा जिंकून दाखवाव्यात, असे आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) एकमेकांविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या रणधुमाळीत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीरभूम येथे निवडणुकीचे बिगूल वाजवले असून, भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
विधानसभा निवडणुकीचा कालावधी जवळ येतोय, तसे भाजप नेते दर आठवड्याला येथे येऊन मुक्काम करत आहेत. मात्र, आम्ही ३६५ दिवस पश्चिम बंगालमध्येच असतो. भाजप नेते फाइव्ह स्टार हॉटेलचे जेवण जेवतात आणि आदिवासी समाजासोबत जेवण करत असल्याचा आभास निर्माण करतात. बंगालच्या जनतेची भाजपकडून दिशाभूल केली जात असल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’; स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम !
- भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘अजिंक्य’ विजय; कोहलीचे खास ट्विट
- ७ जानेवारीला होणार लाँच ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक ला टक्कर देणारी ‘ही’ कार
- ‘द फॅमिली मॅन सीझन 2’चे पोस्टर प्रदर्शित
- उद्या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिन दिल्लीतच साजरा करणार; शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
