मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
औरंगाबाद पाठोपाठ आता मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वबळाने लढण्यास उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २२७ जागा स्वबळावर लढवाव्यात अशी गर्जनाचं केली. यानंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे.
‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’ हा काँग्रेसचा नारा आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याबाबत आम्ही का बोलू नये? आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही मुंबईकरांपर्यंत पोहोचू, त्यांच्या समस्या जाणून घेऊ,’ असा पुनरुच्चार भाई जगताप यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- ‘द फॅमिली मॅन सीझन 2’चे पोस्टर प्रदर्शित
- ७ जानेवारीला होणार लाँच ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक ला टक्कर देणारी ‘ही’ कार
- शेतकरी विरोधी भाजपला गावात ‘नो एन्ट्री’, गावात आले तर घातला जाणार चपलेचा हार !
- ‘ईडी : येथे भाजप विरोधातील नेत्यांना नोटीस दिल्या जातात’


