हिंगोली : पुणे जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून हिंगोलीच्या तरुणाची फसवणूक करणाऱ्या एकाला नाशिक येथून अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत त्याने पुणे येथीलच एक मुख्य साथीदार असल्याची हिंगोली शहर पोलिसांना दिली आहे. त्यावरून आता पोलिसांचे पथक पुणे येथे रवाना होणार आहे.
दरम्यान, २०१५ मध्ये सेवक म्हणून हिंगोली येथील गजानन नागरे या तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून राजन सोनवणे याने ३.९० लाख रुपये घेतले होते. मात्र त्याने नोकरी लावलीच नाही. त्यानंतर त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी पाच वर्षापूर्वी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
राजन सोनवणे हा नाशिक येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने नाशिक येथे जाऊन त्यास राजनला अटक केली. त्यानंतर त्यास हिंगोलीच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिस तपासात राजनने पुणे येथील एक मुख्य साथिदार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांचं एक पथक पुणे येथे रवाना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी, हिंगोली जिल्ह्याने चाचण्या वाढवाव्यात; विभागीय आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
- जालन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाभरात कलम ४४ लागू, मोर्चाला परवानगी नाही
- राज्यातील २८ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट
- ‘सरकारची ‘शक्ती’ मंत्रीमंडळातले मंत्री व कार्यकर्त्यांना वाचवण्यात खर्ची होताना दिसते’
- ‘पेशंट रस्त्यांवर बोंबलत फिरताहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा’, सुनिल केंद्रेकरांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

