Share

जालन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, जिल्हाभरात कलम ४४ लागू, मोर्चाला परवानगी नाही

Published On: 

जालना : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हाभरात कलम १४४ लागू केले आहे. बुधवारी जिल्ह्यात ६६ नवे रुग्ण आढळून आले. यातील ३६ रुग्ण एकट्या जालना शहरात आढळले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश जारी केले आहे. यानुसार ५ पेक्षा अधिक लोक एकत्र जमल्यास त्यांच्यावर करवाई करण्यात येणार आहे. उपोषण, मोर्चे, निदर्शने करण्यास परवानगी नसणार आहे. तसेच, शासकीय, निमशासकीय कार्यालयात निवेदन देताना केवळ 5 जणांना परवाणी असेल.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाच्या वतिने विविध स्तराववर खबरदारी घेतली जात आहे. खबरदरीचा उपाय म्हणून बाधित रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील अॅनेक्स बिल्डिंगमध्ये १३० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, आवश्यक ती औषधी आणि इतर साहित्य सज्ज ठेवण्यात आली आहेत.

जालना जिल्ह्यात १५ फेब्रुवारीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार १३२ इतकी होती. दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी ५५ तर, १७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय प्रयोगशाळेत आणखी २९८ नमुने प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ५४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी १४ हजार २५३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण १३ हजार ६१५ रुग्णांनी कोरोनावर मात केली केली आहे. तर, उपचारादरम्यान ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!