Share

परभणी, हिंगोली जिल्ह्याने चाचण्या वाढवाव्यात; विभागीय आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Published On: 

हिंगोली : मराठवाड्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या आणि काँटॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. नांदेड, परभणी, बीड जिल्ह्याबाबत केंद्रेकर यांनी चिंताही व्यक्त केली. त्यांच्या सूचनांचा एख ऑडिओ संदेशही सोशल मीडियावरून व्हायरल होतो आहे.

हिंगोली, परभणी येथे हजारोंच्या उपस्थितीत विवाह सोहळे होत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता मराठवाड्यातील सर्व मंगल कार्यालयांची तपासणी करा, गर्दी असेल किंवा उपस्थित मंडळी विनामास्क असेल तर मंगल कार्यालयांना नोटीस देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. असे आदेश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परभणी, हिंगोली जिल्ह्याने चाचण्या वाढवाव्यात. दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. त्यामुळे आताच सावध राहा, निष्काळजीपणे काम करू नये अशा स्पष्ट सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या आहेत.

तसेच, यापुढे पोलिस कारवाई करण्याचेही नोटीसमध्ये नमूद करा. दुसऱ्या वेळी हीच परिस्थिती असेल तर मंगल कार्यालय चालकावर गुन्हे दाखल करून कार्यालय पंधरा दिवस सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. याशिवाय कोचिंग क्लासेसच्या ठिकाणी भेट देऊन तेथे मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था आहे किंवा नाही हे पाहावे. खासगी रुग्णालयांमधून सर्दी, तापाच्या रुग्णांना कोविडची चाचणी करण्यास सांगितले जात नाही. त्यामुळे या खासगी रुग्णालयांना पत्र देऊन या रुग्णांना कोविड चाचणी बंधनकारक करण्याच्या सूचना द्याव्यात, असे केंद्रेकर यानी सांगितले. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच संशयित रुग्ण विनामास्क फिरत असेल तर त्यांच्यावर साथरोगाचा फैलाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!