Share

विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – पाटील 

Published On: 

पुणे – आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व २८८ जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भारतीय जनता पार्टी सज्ज आहे, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते. तथापि, सरकार पडेल की टिकेल याचा विचार न करता एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून भाजपा ठामपणे काम करत आहे. विदर्भ मराठवाड्यातील प्रचंड पुरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसले तरी पूरग्रस्तांना भेटण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा दौरा सुरू झाला आहे. राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभेच्याही राज्यातील सर्व ४८ जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे. लोकसभा, विधानसभा किंवा महानगरपालिका अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाने तयारी करावी अशी केंद्रीय नेतृत्वाची सूचना आहे. त्यानुसार संघटना काम करत आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व ९७ हजार बूथमध्ये प्रत्येकी दहा पक्ष कार्यकर्त्यांच्या समित्या नेमण्याचे काम भाजपाने पूर्ण केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून मा. नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस ७ ऑक्टोबर रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस राज्यातील बूथ समित्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. त्यावेळी पक्षाचा संघटनात्मक विस्तार सर्वांना जाणवेल. प्रत्येक बूथमध्ये दहाजणांच्या समित्या स्थापन झाल्यावर पक्षाकडून आता प्रत्येकी १८० पर्यंत विस्तार करण्याचे काम सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!