🕒 1 min read
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आजपासून राज्यात शाळा सुरू झाल्या असून अद्याप १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण झालेले नाही. याबाबत पवार म्हणाले की, १२ ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण करावे, अशी चर्चा आहे. परंतू, केंद्राकडून तसा कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा आहे. अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही, असेही ते म्हणाले.
‘पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने नगर जिल्ह्यातील ६१ गावांवर निर्बंध लावले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला याचा फटका बसू नये, यासाठी आत्ताच नगर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील रुग्ण संख्या रोखण्यासाठी निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री पवारांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; जिप्सी जाळली, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात
- घरी जा, गुगलवर ‘टरबूज ऑफ महाराष्ट्र’ सर्च करा; खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले काम
- ‘शेतकऱ्यांना काठीचीच भाषा कळते, लाठ्या-काठ्या उचला, अन् जशास तसे उत्तर द्या’
- ‘शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपची ‘पॉलिसी’ आहे का?, त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीशी वागणूक’
- तेही म्हणत असतील कारखान्याला माझे नाव देऊन वाट लावली- अजित पवार


