मुंबई: मुंबईतील मालाड मालवणी भागातील एका क्रीडा संकुलाच्या वीर टिपू सुलतान क्रीडांगण (Tipu Sultan stadium) या नावावर भाजप पक्षाने आक्षेप घेतला आहे. तसेच मुंबईमध्ये राडा देखील भाजपने घातला होता. यावरुन आता कॉंग्रेसने भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. भाजप जाणीवपूर्वक मुंबई व राज्यातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
या प्रकरणी कॉंग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) म्हणाले, टिपू सुलतान नावावरून भाजप धार्मिक रंग देऊन राज्यातील वातावरण बिघडवू पाहत आहे. जीवघेणी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्यांवर केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरले असून या मुख्य मुद्यांना बगल देऊन पाकिस्तान, मंदिर, मशिद, धर्म संसदेच्या माध्यमातून धार्मिक मुद्दे चर्चेत आणून भाजप राजकारण करत आहे, असा आरोप लोंढे यांनी भाजपवर केला आहे.
पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले, भाजपने धार्मिक मुद्दे सोडून निवडणूक लढवून दाखवाव्यात. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून दोन वर्षात सरकारने केलेल्या कामामुळे जनतेचा विश्वास वाढत असून भाजपचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्यासाठी टिपू सुलतानच्या नावावरून धार्मिक द्वेष पसरवून दंगली घडवण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप देखील अतुल लोंढे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
तब्बल ११ वर्षांनी क्रिकेट आशियाई क्रीडा स्पर्धेचा भाग ; भारतीय क्रिकेट संघाचे पर्दापण
महाराणा प्रतापांचा पुतळा बसवतांना मी पुढे असेल; अब्दुल सत्तारांनी जलील यांना खडसावले!
“ब्रिटिशांशी लढणे ही देशभक्तीची एकमेव अट असेल तर मोहम्मद अली जिना देखील खूप मोठे देशभक्त ठरतात”
शिवसेना-भाजप युतीबाबत उतावीळ सत्तारांचे आणखी एक विधान म्हणाले; नितीन गडकरीच बांधू शकतात पूल..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

