औरंगाबाद: औरंगाबादेत सुरू असलेल्या महाराणा प्रताप पुतळ्याच्या वादावर आता शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनीही उडी घेतली आहे. औरंगाबाद येथे महाराणा प्रतापांचा पुतळा उभा राहणारच. त्यासाठी मी पुढाकार घेईन. पुतळा बसवतांना मी स्वतः पुढे असेल. असे म्हणत जलील यांनी विरोध करू नये, असा सल्ला त्यांनी खासदार इम्तियाज जलील(Imtiyaj Jaleel) यांना दिला आहे.
औरंगाबाद शहरातील कॅनोट परिसरात महाराणा प्रतापांचा पुतळा उभारण्यावरुन पुन्हा एकदा जातीय राजकारण सुरू झाले आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला केलेल्या विरोधानंतर जलील यांना शिवसेनेतून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला.
जलील यांनीही पुतळ्यांना माझा विरोधच नाही असे म्हणत लोकवर्गणीतून पुतळा उभारावा, त्यासाठी आमची हरकत नसल्याचे सांगितले होते. तसेच शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण का करता? असा सवालही खैरेंना विचारला होता. आता या वादामध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनीदेखील नवे विधान केले आहे. सिल्लोड नगर परिषदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात अब्दुल सत्तार म्हणाले, औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसणारच इम्तियाज जलील यांनी विरोध करू नये, असे मी त्यांना आवाहन करतो. पुतळा बसवतांना त्यावेळी मी स्वतः पुढे असेल. असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:

