Share

ज्या बापाने आयुष्यभर मुलींना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले त्या लेकींनी बापाच्या अखेरच्या प्रवासात दिली साथ!

Published On: 

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील तिसगाव येथील पुरुषोत्तम नंदूलाल खंडेलवाल यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत सकारात्मक बदल आणि एक चांगला आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला आहे. ज्या बापाने आयुष्यभर मुलींना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले त्या लेकींनी बापाच्या अखेरचा प्रवासात साश्रूनयनांनी त्याला साथ दिली आहे. त्याचप्रमाणे पुरुषांनीच खांदा देण्याची प्रथा असलेल्या भारतीय संस्कृतीत यानिमित्ताने बदलही घडतांना दिसून येत आहेत.

पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुरुषच खांदादेतात. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत आत्तापर्यंत महिलांनी, मुलींनी पार्थिवाला खांदा दिल्याची घटना अतिशय दुर्मिळ आहे. आज अनेक ठिकाणी अंत्ययात्रेतही महिला सहभागी होत नाहीत. मात्र एकविसाव्या शतकात अनेक नवे बदल घडतांना दिसून येत आहेत. औरंगाबाद शहरातील तिसगावातही अशीच घटना घडली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर पाचही मुलींनी आपल्या वडिलांना अखेरची साथ दिली आहे. याआधी औरंगाबाद जिल्ह्यात मुलांनी नाकारलेल्या आईला मुलींनी खांदा दिल्याची घटना ताजीच आहे. यावरून समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे दिसून येत आहे.

तिसगाव येथील पुरुषोत्तम नंदूलाल खंडेलवाल यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पाच मुलींनी पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले. रेखा खंडेलवाल, राखी खंडेलवाल, राणी खंडेलवाल, आरती खंडेलवाल, पूजा खंडेलवाल अशी या पाच मुलींची नावे आहेत. खंडेलवाल यांना मुलगा नाही. गुरुवारी (दि.२०) तीसगाव येथून अंत्ययात्रा निघाली. त्यावेळी नातेवाईक आणि जावई खांदा देण्यासाठी पुढे आले. मात्र पाचही मुलींनी आपण आपल्या वडिलांना खांदा देणार असल्याचा निर्णय जाहीर केला. आणि नातेवाईकांनीही मुलींचा या आग्रहाला प्रतिसाद देत रूढी परंपरा बासनात गुंडाळून ठेवल्या. अशाप्रकारे ज्या वडिलांनी आयुष्यभर मुलींना प्रेम दिले, चांगले संस्कार दिले त्या मुलींनी अतिशय जड अंतकरणाने वडिलांना शेवटचा खांदा दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!