Share

राणीच्या बागेत १०६ कोटींचा घोटाळा; भाजप आमदार कोटेचा यांचा आरोप

Published On: 

मुंबई: येथील राणी बागेत दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा गैरप्रकार झाला असून ही निविदा प्रक्रिया त्वरीत थांबवावी अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा (BJP MLA Mihir Katecha) यांनी केली आहे. मिहीर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. यावेळी त्यांनी इतर अनेक घोटाळ्यांबाबत माहिती देत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मिहिर कोटेचा म्हणाले, भाजपने मुंबई महापालिकेतील रस्ते कामातील घोटाळे उघडकीस आणून महापालिकेचे १३६ कोटी रुपये वाचवले होते. परिवहन महामंडळाच्या ई-तिकीट यंत्र खरेदीतील घोटाळाही भाजपने उघडकीस आणला, असंही कोटेचा यावेळी म्हणाले आहेत. आता महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. शंभर कोटींच्या वरच्या निविदेत विदेशी कंपन्याही उतरू शकतात. त्यामुळे १८५ कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले, असं आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितलं. या संदर्भात माहिती देताना काटेचा म्हणाले, निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना २० ऑक्टोबर रोजी पाठविले होते.

पुढे बोलताना मिहिर कोटेचा म्हणाले, हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी १०६ कोटी अधिक रकमेची निविदा सादर केली आहे. १८८ कोटींच्या बोलीसाठी २९४ कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी सांगतिलं. या संदर्भात आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. या प्रक्रियेच्या चौकशीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सध्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेले महापालिकेचे निवृत्त उपायुक्त हे ‘भ्रष्टाचाराचे महामार्ग’ तयार करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!