Share

किलेअर्क परिसरातील ‘ती’ घरे जमिनदोस्त; डोळ्यासमोर घरं उध्वस्त होतांना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू!

Published On: 

औरंगाबाद: सिटी चौक परिसरातील नौबत दरवाजा रस्ता रुंदीकरण मोहीमे अंतर्गत दिवसभरात एकूण १२ अतिक्रमणे काढण्यात आली. सिटी चौक, रोहिला गल्ली मार्गे किलेअर्क शंभर फुटी रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामात अतिक्रमणांमुळे मोठ्याप्रमाणावर अडथळे येत होते. महापालिकेने नागरिकांचा विरोध मोडून काढत कारवाई पूर्ण केली आहे. मात्र आपल्या डोळ्यासमोर आपले घर उध्वस्त होतांना पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर चिंता आणि डोळ्यात अश्रू होते.

ऐतिहासिक नौबत दरवाजाच्या सुशोभीकरणाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत सुरूच आहे. सदर रस्त्याचे काम पंचकुआ कब्रस्तान पर्यंत आले आहे. या ठिकाणी मोठा ब्रिज करून तो सरळ रस्ता नौबत दरवाजापर्यंत जाणार आहे. या रस्त्याला बाधित ठरणारे १२ बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. संबंधित लोकांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आणि घरे रिकामी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

तरी या भागातील काही नागरिक अतिक्रमणे काढत नसल्याने याबाबत प्रशासक यांनी यापूर्वीच अतिरिक्त आयुक्त यांना रस्त्याचे काम होण्यासाठी अतिक्रमणे काढण्या बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने ५ जानेवारी २०२२ रोजी पहिला टप्पा म्हणजे रोहिल्ला गल्ली ते पंचकुआ कब्रस्तान समोरील एकूण दहा बांधकाम निष्कासित केलेली आहेत. व उर्वरित बांधकामे बुधवारी निष्कासित करण्यात आली. शंभर फुटी रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे.

मनपाच्या कर्मचाऱ्यांची घरे

ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली तेथे ८० टक्के घरे ही मनपाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची असल्याने महापालिकेने आम्हा गरिबांच्या घरात हातोडा का मारला? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच कारवाई सुरू असताना एक महिला जेसीबी समोर देखील आली होती. मात्र पथकाने तिला बाजूला केले. या नागरिकांना पुनर्वसनाचे लेखी आश्वासन देखील आत्तापर्यंत मिळालेले नाही. ८० टक्के घरे ही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!