Share

PM Modi Pune Visit: मेट्रोवरून अजित पवारांची नरेंद्र मोदींना खास विनंती; म्हणाले…

Published On: 

पुणे: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या छोटेखानी पुणे शहराच्या दौऱ्यात अनेक विकासकामांचे उद्घाटन झाले. पुणे महानगरपालिका भवनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण पण यावेळी करण्यात आले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार देखील या कार्यक्रमांना उपस्थित होते.

कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांनी नंतर भाषण सुद्धा केले. यावेळी अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना खास विनंती केली आहे. “पुणे मेट्रो उशिरा का होईना सुरु झाली आहे. काहीच वर्षांपूर्वी नितीन गडकरींच्या नेतृत्वामुळे नागपूर मेट्रो सुद्धा विक्रमी वेळात सुरु करण्यात आली होती. आता पिंपरी, ठाणे आणि नागपूर-२ मेट्रोसाठी पण मदत करा” अशी विनंती अजित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.

यापुढे बोलताना अजित पवारांनी नितीन गडकरी यांना सुद्धा याचना केली आहे. नितीन गडकरींना उद्देशून अजित पवार म्हणाले कि, ” नितीन गडकरीजी तुमच्या आणि मोदींच्या मदतीमुळे नागपूर आणि पुणे मेट्रो सुरु झाल्या आहेत. अशीच मदत आता नागपूर, मुंबई, पुणे, नाशिकमधील मेट्रोच्या उर्वरित कामांसाठीसुद्धा होऊद्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. मेट्रोसारख्या विकासकामांमध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचे राजकारण करणार नाही अशी ग्वाही सुद्धा आज भाषणावेळी अजित पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!