🕒 1 min read
मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. असे असतांनाच आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. आज (७ मे ) तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केंद्र सरकारवर तसेच मनसेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘घरगुती गॅस चा भाव परत वाढला. तसेच गॅस चे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा’, अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
घरगुती गॅस चा भाव परत वाढला
गॅस चे वाढलेले दर भोंग्यां वरून जाहीर करा #महागाई— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 7, 2022
दरम्यान, यापूर्वी याच मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी “आखिर क्यों” या चित्रपटातील एका गाण्याच्या काही ओळी ट्विट केल्या होत्या. ते म्हणाले होते की,‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमे ईनाम दिया है. तूफाँ में हमको छोड़ के साहिल पे आ गये. दुश्मन न करे दोस्त नेवो काम किया है…’ तसेच मंदिरावरचे भोंगे काढा असे म्हंटल्यानंतरची ही नैसर्गिक प्रतिक्रिया असल्याचेही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “…मुख्यमंत्र्यांनी विसरू नये”, अतुल भातखळकर यांचा टोला
- IPL 2022 GT vs MI : रोहितच्या एका षटकारामुळं गेंड्यांना मिळाले ५ लाख..! नक्की झालं काय? पाहा VIDEO
- “…हा फरक समजून घ्या”, सदाभाऊ खोत यांची मविआ सरकारवर टीका
- भाजप नेत्या उमा भारती यांच्याकडून शिवसेनेला टोला; ट्वीट करत म्हणाल्या…
- “…त्याचे परिणाम देर सवेर असेच येतात”, अतुल भातखळकर यांचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
