Share

“हिंदू समाजातच फूट पाडून…”, भोंग्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची मनसेवर टीका

Published On: 

मुंबई : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मनसेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘या सर्व गोष्टींचा सर्वात मोठा झटका भजन, कीर्तन करणाऱ्या मंडळांना बसला आहे. खरंतर त्यांना हिंदू समाजातच फूट पाडून आपआपसात दंगली निर्माण करायच्या आहेत. सुदैवाने महाराष्ट्रात असं काही होऊ शकलं नाही’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले असून इथे फक्त कायद्याचे राज्य आहे. या राज्यात सर्वोच्च न्यायालयाचे जे निर्देश आहेत त्यानुसार काम होईल.’ तसेच काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते, असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!