🕒 1 min read
मुंबई: सध्या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचा हंगाम सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्ष आपापली ताकद पणाला लावत आहेत. त्याच सोबत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील जोरदार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या निवडणूक असणाऱ्या राज्यांमध्ये दौरा करत असून त्यांना भाजपाकडून आव्हान देण्यात आलं आहे. पूर्ण देशभरात फिरून तुम्ही निवडणुकीचं काम करत आहात. मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कोणती निवडणूक लढवली? कोणत्या ठिकाणी असं झालं की तुम्ही जाऊन प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून आला. तुम्ही जिथे जिथे गेलात, तिथे उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं,असं मोहित कंबोज भारतीय म्हणाले.
तसेच पुढे बोलताना मोहित कंबोज भारतीय म्हणाले, मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब. २०२२च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या. मुंबईतला तुम्हाला वाटेल तो सर्वात सुरक्षित वॉर्ड घ्या आणि तिथून निवडणूक जिंकून दाखवा. तेव्हा आम्ही मानू की तुम्ही किती मोठे चाणक्य आहात, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या मदतीने कोविड घोटाळा केला”, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- एकत्र पाहणीचा अर्थ युती असा होत नाही- अजित पवार
- “आम्ही विरोधात असताना…”; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
- IPL 2022: पंड्या बंधू पुन्हा एकाच संघात खेळणार; कृणाल पंड्याचा ऑक्शनपूर्वी इशारा
- IPL 2022: IPL मेगा ऑक्शन आधी पंजाब संघाला मोठा धक्का; “ दुआ मे याद रखना” म्हणत दिग्ग्जाचा राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
