मुंबई – गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून दिवसेंदिवस बाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसतेय. सोमवारी देशात २ लाख ७३ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर गेल्या २४ तासात आज २ लाख ५६ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळ्याचे समोर आले आहे. या कालावधीत १ हजार ७६१ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या चोवीस तासांत राज्यात ५८ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे. संचारबंदील लावूनही राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत चालल्याने सरकार चिंतेत असून या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक दुपारी साडेतीन वाजता बोलावण्यात आली आहे.
राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव प्रमाणावर वाढताना दिसत आहे यामुळे कोरोनाच्या रुग्णांना बेडची कमतरता जाणवत आहेत. महाराष्ट्र सरकारने सर्व धार्मिक स्थळांचे हॉल ताब्यात घेऊन हॉलचे रूपांतर रुग्णालयात करावे जेणेकरून कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध होतील. @OfficeofUT @AjitPawarSpeaks
— SACHIN KHARAT RPI राष्ट्रीय अध्यक्ष (@RPIsachinkharat) April 20, 2021
दरम्यान, महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे यामुळे कोरोनाच्या रुग्णांना बेडची कमतरता जाणवत आहेत. महाराष्ट्र सरकारने सर्व धार्मिक स्थळांचे हॉल ताब्यात घेऊन या हॉलचे रूपांतर रुग्णालयात करावे जेणेकरून कोरोनाच्या रुग्णांना बेड उपलब्ध होतील अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
- नियमांना कोणी जुमानेना ! राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक; ‘हे’ नियम लागू होण्याची शक्यता !


