दुबई- आयपीएल 2020च्या तेराव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. जो संघ आजचा सामना जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल.
यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफ फेरीसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या चार टीम पात्र झाल्या. एका बाजूला मुंबई इंडियन्सने दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे तर पराभूत झालेल्या दिल्ली कॅपिटल्सला नियमाप्रमाणे क्वालिफायर टू मॅच खेळण्याची संधी मिळाली.
कोहलीच्या संघाचा पराभव करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला क्वालिफायर टू मॅच खेळण्याची संधी मिळाली. आज अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर क्वालिफायर टू मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांची टक्कर होणार आहे.
या मॅचमध्ये जिंकणारी टीम फायनलमध्ये मुंबई विरुद्ध खेळेल तर पराभूत टीमचे आयपीएलमधील आव्हान संपेल. या सामन्यात हैदराबाद संघ दिल्लीपेक्षा मजबूत आहे अशीच चर्चा रंगली आहे. हैदराबादच्या एका गोलंदाजामुळे दिल्ली संघ चांगलाच त्रस्त आहे.
महत्वाच्या बातम्या
- डॉक्टरांची मेहनत आली फळाला, लढवय्या पँथरने दिला कोरोनाला धोबीपछाड
- लोकशाहीचं रक्षण करा आणि कधीही क्षुल्लक समजू नका! – अमृता फडणवीस
- नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता – राहुल गांधी
- कंगनाने साधला जो बायडेन यांच्यावर निशाणा; म्हणाली हे तर ‘गजनी’
- राज्य सरकारने शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करु नये- नारायण राणे


