मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव राष्ट्रपतिपदासाठी समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये चर्चांना ऊत आला होता. पण, ‘राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याबाबतची बातमी पूर्णपणे असत्य आहे’ असं म्हणत खुद्द शरद पवार यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 2024 ची निवडणुकीचे तिसरी आघाडी नेतृत्व किंवा राष्ट्रपतिपद निवडणुकीबाबत प्रशांत किशोर यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या भेटीतही अशी कोणतीही चर्चा झाली नाही’ असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. तसंच, ‘भाजपचे संख्याबळ लक्षात घेता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता अशी कोणतीही शक्यता नाही, असंही पवारांनी सांगितलं.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी,काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्यातील निवडणुकाच नव्हे तर आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांवरही चर्चा झाली होती आणि यासाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाव समोर आलं होतं. या संपूर्ण घडामोडीवर अखेर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा… pic.twitter.com/2NmzXnQ10j
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 14, 2021
दरम्यान, भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी यानिमित्ताने शरद पवारांना टोला लगावला आहे. शरद पवारांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते अशी टीका करताना हास्यास्पद हाचलाची सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीचा विचार केला तर लोकसभा, राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असंही ते म्हणाले आहेत. त्यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय काही साध्य होणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान अतुल भातखळकर यांनी ट्वीट करताना किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा असा टोलाही लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
- ‘महानायक अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची ‘प्रतिक्षा” ; बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर
- आयपीएलपुर्वी दिल्ली संघासाठी चांगली बातमी! ‘तो’ परत येतोय
- ‘आमच्या वर्गातला एक मुलगा अभ्यास न करता पहिला यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच झालयं…’


