Share

भाजपच्या ‘या’ मंत्र्याने दिला राजीनामा; शिवसेनेने म्हटले ‘उत्तर प्रदेश.. परिवर्तन की ओर..’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: लवकरच ५ राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मात्र त्यापूर्वी अनेक आमदारांच्या पक्षबदलीच्या कार्यक्रमांचेच अधिक धक्के पक्षांना भेटत आहे. आजच समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता भाजपलाही मोठा धक्का बसला आहे. भाजपचे मंत्री दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. एकीकडे राष्ट्रवादीने उत्तर प्रदेशात परिवर्तनाचे वारे वाहणार असा दावा केला, तर त्याला शिवसेनेनेही उत्तर प्रदेशात भाजपने कितीही नोटा टाकल्या तरी, शिवसेना त्या नोटांशी लढणार असा इशारा देत भाजपला खुले आव्हान दिले आहे. आता यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut ) यांनीही ट्वीट करत भाजपला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

त्यातच आता मंत्री दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्याने भाजपला मोठा धक्काच बसला आहे. यावरच संजय राऊत यांनी दारा सिंह चौहान यांच्या राजीनामा दिलेल्या पत्राचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. तर ‘उत्तर प्रदेश.. परिवर्तन की ओर..’ अशा आशयाचे कॅप्शन देत भाजपला इशारा दिला आहे.

दारा सिंह यांनी पत्रात काय म्हटले?

” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळात वन व पर्यावरण आणि जन्तु उद्यान मंत्री म्हणून मी मन लावून माझी जबादारी निभावली. पण सरकार वंचित, दलित, शेतकरी आणि नोकरदारांची घोर उपेक्षा करत आहे. तसेच वंचित, दलित यांच्या आरक्षणातही छेडछाड केली जात आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेश मंत्रीमंडळाचा राजीनामा देत आहे.” असे पत्र दारा सिंह यांनी लिहिले आहे. यामुळे एकच राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान आजच समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सहारणपूरमधील बेहात मतदारसंघाचे आमदार नरेश सैनी(Naresh Saini), फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघाचे आमदार हरीओम यादव (Hariom Yadav) याचबरोबर समाजवादी पक्षाचे माजी आमदार धर्मपालसिंह (Dharmapal Singh) यांनीही आज भाजपमध्ये प्रवेश केला. यात विशेष म्हणजे हरीओम यादव हे अखिलेश यादव यांचे नातेवाईक आहेत.त्यामुळे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!