मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राणेंना अटक करण्यात आली होती. राणेंच्या अटकेनंतर सिंधदुर्गमध्ये संचारबंदी लावण्यात आली. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शेलारांनी ठाकरे सरकारला जोरदार टीका केली आहे.
राणेंना झालेली अटक ही बेकायदेशीर पद्धतीने झाली आहे. या अटक सत्रामध्ये मंत्रिमहोदयांनी हस्तक्षेप केलेला दिसतोय. मुंबई उच्च न्यायालयाचा यामध्ये उल्लेख आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा बदमनामी करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप यावेळी आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच ‘नारायण राणे याआधीही त्यांच्या शैलीत बोलले आहेत, पण यावेळी आकांडतांडव करण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न म्हणजे राणे यांच्या त्या वाक्यावरचा राग नसून मुख्यमंत्र्यांचं स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव दिनाचं अज्ञान उघड झाल्याचा थयथयाट आहे,’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
स्वत:च अज्ञान उघड झालं, ते लपवायचं कसं म्हणून हा सर्व थयथयाट आहे, असं सांगत आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देशाची आणि महाराष्ट्राची क्षमायाचना करणार आहात का? असा सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री 75वा अमृतमहोत्सव विसरतात, यासाठी भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 75 हजार पत्र लिहिणार असल्याचंही आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
‘हा भारत देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा 75 वा अमृत महोत्सव आहे, कृपया लक्षात ठेवा’, अशा स्वरुपाची 75 हजार पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहे. यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहणार नसेल तर पुढच्या टप्प्यात गांधीगिरी करुन पण फुलं नाहीत तर काटे पाठवून त्यांना लक्षात राहण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपच्या सावेंकडे प्रदेश सरचिटणीस तर घुगे यांच्याकडे चिटणीस पदाची जबाबदारी
- ‘सख्खा भाऊ योगी, शहांबद्दल असं बोलत नाही’; राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या चुकीच्या वक्तव्याचे दाखले
- राणे प्रकरणातही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; ‘विरोधात’ही दानवे-खैरे यांची तोंडे ‘विरुद्ध’ दिशेला!
- ‘देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतात ते मी स्वीकारेल’
- अफगाणी नागरिकांना यापुढे देश सोडून जाण्याची परवानगी देणार नाही – तालिबान


