मुंबई : मराठी अभिनेता संजय नार्वेकर यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘वास्तव’ या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. बऱ्याच काळानंतर आता संजय नार्वेकर छोट्या पद्यावर काम करण्यास सज्ज झाले आहे. स्टार प्रवाहवरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेत ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
या मालिकेत संजय नार्वेकर इन्सपेक्टर गौतम साळवी ही दमदार भूमिका साकारणार आहेत. एका मुलाखतीत संजय नार्वेकरांनी या भुमिकेबाबत म्हणाले, “नाटक आणि चित्रपटांमध्ये यापूर्वी प्रेक्षकांनी मला पाहिलं आहे. मालिकेसाठी बराच वेळ द्यावा लागतो. चित्रपट आणि नाटक सुरु असल्यामुळे मला तो वेळ मालिकेसाठी देता आला नाही. मात्र आता सुवर्णयोग जुळून आलाय. कोणतंही पात्र साकारताना त्याला वेळ आणि योग्य न्याय देता आला पाहिजे असं मला वाटतं. इन्सपेक्टर गौतम साळवी हा एक डॅशिंग, जबाबदार आणि प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे.’
सध्या ही मालिका प्रचंड चर्चेत असते. ही मालिका सध्या एका वेगळ्या वळणावर आहेत. त्यातच आता संजय नार्वेकरांचे आगमन होणारअसल्याने प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. तसेच त्यांचा चाहता वर्ग देखील त्यांना पुन्हा एकदा पाहण्यास उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दिन सिद्दिकी; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- ‘१४,००० धावांचा विक्रम कर्णधार पोलार्डला समर्पीत’, – ख्रिस गेल
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- ‘तुमचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?’; वाचा नारायण राणे यांचं खास पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

