मुंबई – अदानी समूहाने जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतला आहे. याबाबतचे निवेदन कंपनीने प्रसिद्ध केले आहे. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदील दिला होता. इतर काही खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणे बाकी होते. आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेण्यात आला आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे असणारा 50.5 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचे निश्चित झाले होते. त्याचप्रमाणे कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण आफ्रिकन कंपन्यांशीही करार करून त्यांच्याकडील 23.5 टक्के वाटा आपल्या नावावर करण्याचाही करार केला होता. मुंबई विमानतळावर हजारो नोकऱ्या उपलब्ध करू असे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले आहे.
जयपूर विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम विमानतळ आणि गुवाहाटीमधील गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनौमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ, मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात करार झाला आहे.
जुलै महिन्यातच यासंदर्भातील सर्व ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जात आहे. ही सर्व विमानतळे पुढील 50 वर्षे अदानी समूहाच्या ताब्यात असतील. या काळात या विमानतळांचा विकास, प्रशासकीय कामकाज आणि देखभाल अदानी समूहाकडून करण्यात येईल. अदानी समूहाकडून देशातील अधिकाअधिक विमानतळांचा कारभार हाती घेण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दिन सिद्दिकी; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय?
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- स्वबळाचे नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांनी फटकारले, कॉंग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सूचनावजा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
