Share

आयसीसीच्या आक्षेपामुळे ख्रिस गेलने केला बॅटमध्ये ‘हा’ बदल

Published On: 

मुंबई : वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला सलग तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचे तोंड बघावे लागले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १४२ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने केवळ चार गडी गमावत सहज पार केले. यासह वेस्ट इंडिजने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना ख्रिस गेलसाठी पुनरागमनाचा सामना ठरला. २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेतील अर्धशतकानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. या सामन्यात मात्र ख्रिस गेलच्या बॅटमध्ये एक बदल दिसला. नेहमीप्रमाणे ‘युनिव्हर्स बॉस’ असे न लिहीता बॅटवर केवळ ‘द बॉस’ असे लिहीले होते. यासंदर्भात गेलला विचारले असता त्याने हा बदल आयसीसीमुळे केला असल्याचे सांगितले आहे.

गेलच्या सांगण्यानुसार आयसीसीला गेलच्या ‘द युनिव्हर्स बॉस’ या स्टिकरवर आक्षेप होता. त्यामुळे गेलने ‘द युनिव्हर्स बॉस’चे स्टिकर लावु नये असे आयसीसीचे म्हणणे होते. त्यामुळे त्याने के स्टिकर छोटे करत केवळ ‘द बॉस’ असे ठेवले. यावेळी पुढे बोलतान गेल म्हणाला की,’आयसीसीला युनिव्हर्स बॉस या शब्दावर कॉपीराइट करायचे असेल म्हणून हा अक्षेप घेतला आसेल. मात्र खरा युनिव्हर्स बॉस हा मीच आहे’ असे म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!