मुंबई – जर वेगळं लढण्याचं ठरलं असेल तर आधीच सांगा, जेणे करुन आम्ही देखील तयारीला लागू…अशा शब्दात खा. शरद पवारांनी स्वबळाचे नारे देणाऱ्या काँग्रेसला सूचना वजा इशारा दिलाय.काल शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात खलबतं झाली यावेळी पवारांनी कॉंग्रेस नेत्यांचा चांगलाच क्लास घेतल्याची माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे या बैठकीपासून नाना पटोलेंना दूर ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक वक्तव्यांनी महाविकास आघाडीला हादरे देणाऱ्या नाना पटोलेंना हायकमांडचा पाठिंबा आहे का अशी विचारणा देखील पवारांनी केल्याचं समजतंय. पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा तुमचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला असेल तर मला त्याविषयी काहीच बोलायचं नाही. मुंबई काँग्रसचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना आपण यासंदर्भातले अधिकार दिलेत? दिले असतील तर तसंही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही तुमच्या वक्तव्याकडे लक्ष देणार नसल्याचं पवार म्हणालेत.
पक्ष वाढवण्याच्या भाषेविषयी आपल्या मनात कुठलीही शंका नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढवला देखील पाहिजे. मात्र ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही. अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा स्पष्ट शब्दात पवार काँग्रेस नेत्यांशी बोलले असल्याचं वृत्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कंगनाच्या चित्रपटात दिसणार नवाजुद्दिन सिद्दिकी; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय?
- नवख्या इंग्लंडकडुन पाकिस्तानला व्हाईटवॉश; अखेरच्या सामन्यात ३ गडी राखुन विजय
- ‘मुंबईची २०२४ पर्यंतची विजेची गरज लक्षात घेता वीजनिर्मिती तसेच वीजपुरवठ्याचे प्रकल्प गतीने मार्गी लावा’
- ‘तुमचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?’; वाचा नारायण राणे यांचं खास पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
