मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सतत आरोप करत असणारे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) सध्या एका फोटोमुळे अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. या फोटोत किरीट सोमय्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईली तपासत असून फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे.
या प्रकरणावरून किरीट सोमय्या यांच्यावर कॉंग्रेस नेत्यांनी टीका करायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी सोमय्या यांच्यावर टीका करत म्हणलं आहे की, किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे. जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी. जर गुन्हा घडल्याचं सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले, भाजपा नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झालं आहे. महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे, असंही यावेळी म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील सोमय्यांवर टीका केली आहे, नगरविकास खात्याने हे तपासून पहावं. फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही, असं आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
‘ऊर्जामंत्र्यांचे ते विधान बरोबर नाही’; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
संजय राऊतांच्या व्यंगचित्रावर भाजप आक्रमक; पुनम महाजन म्हणाल्या,“नामर्दांसारखे कार्टून…”
“संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”
‘…म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

