Share

“धमक असेल तर माझ्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवा, तुमची देखील ‘तीच’ अवस्था होईल”

Published On: 

बारामती : आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार ठीक ठिकाणी सांगत असतात. हाच धागा पकडून पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली.

आटपाडी तालुक्यातून सांगली, सातारा जिल्हा सोडून अवघ्या पंधरा दिवसाच्या तयारीने निवडणूक लढवली. अजित पवारांच्यात धमक असेल तर त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन स्थानिक नेत्यांचे पाठबळ नसताना निवडणूक लढवली तर तुमची ही अवस्था तीच होईल. असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना खोलीच्या बाहेर थांबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यापासून पवारांची मानसिकता बिघडल्यासारखी वाटते, असा खोचक टोला देखील गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!