पुणे : शनिवारी ( १९ जून ) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यालयाचा उद्घाटनाचा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील निर्बंध हळूहळू शिथील होत आहेत. मात्र, विकेंड लॉकडाऊन अद्यापही कायम असून शनिवार-रविवार पुण्यात केवळ अत्यावश्यक सुविधा वगळता इतर निर्बंध कायम आहेत.
मात्र, असे असले तरी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेली तुफान गर्दी पाहून राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांना कोरोनाचं गांभीर्य नाहीये का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर तुफान गर्दी केली होती. कोविड प्रतिबंधक नियमांना राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः पायदळी तुडवल्याचे यावेळी पहायला मिळाले
यावर आता जोरदार राजकारण तापायला सुरवात झाली असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अजित पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनतर कार्यक्रमस्थळी झालेल्या गर्दीवरून अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘कार्यक्रमाच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यासाठी मी पोलिसांना सांगणार आहे.’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तर, गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्यांचा हिरमोड झाला असता, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो, असं देखील पवार अजित म्हणाले. दिमाखदार कार्यक्रम होत असताना तुम्ही नियम पाळले नाहीत त्यामुळे मनात खंत वाटते, असं कार्यकर्त्यांना उद्देशून अजित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- गिलला बॉल लागताच सिराजने केले असे काही ; होत आहे कौतुक
- ‘लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत, फक्त निवडणुकांची प्रतीक्षा आहे’
- ‘फादर्स डे’ निमित्त सचिनने शेअर केली भावुक पोस्ट
- ‘पुणेकर नागरिक या चमकोगिरीला कधीही माफ करणार नाहीत’, महापौरांचा हल्लाबोल
- इंग्लंड दौऱ्यावरील एकमेव कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात भारतीय संघाला यश


