Share

‘दुर्योधनाने पांडवांना ५ गावे देण्याचे देखील नाकारले होते, पुढचा इतिहास सर्वश्रुत’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तागोंधळानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष प्रथमच एकत्र येत ‘महाविकास आघाडी’ स्थापन करत महाराष्ट्राच्या सत्ता सुंदरीला गवसणी घातली आहे. या तिन्ही पक्षाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. सत्ता स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात वादाची मालिका सुरूच आहे.

राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नाकरण्यात आली होती. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली आहे. तर नंतर स्पाईस जेट मधून राज्यपाल देहरादूनला रवाना झाले होते.

यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेते अवधूत वाघ यांनी महाभारताचा दाखला देत राज्य सरकार टीका केली आहे. ‘दुर्योधनाने पांडवांना ५ गावे देण्याचे देखील नाकारले होते. पुढला इतिहास सर्वश्रुत आहे’ अस म्हणत वाघ यांनी घणाघात केला आहे.

दरम्यान, राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र सरकार हा वाद पहिल्या दिवसापासून सुरु आहे. मग ते शपथविधी दरम्यान घेतलेल्या नेत्यांच्या नावावरुन असो वा आता रखडलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन असो, हा वाद वाढतच आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. यावरून ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्या वादाने नवीन परिसीमा गाठली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!