पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे १६ वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली. ‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
आता या सर्व घटनाक्रमाचे तीव्र पडसात उमटायला लागले आहेत. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पडळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. मिटकरी यांनी पडळकरांना पिसाळलेली वृत्ती म्हणत घणाघात केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिनेस्टाईल खूनाचा उलगडा; दारू पाजली, गळा आवळला, पेट्रोल टाकून गाडी दरीत लोटली
- जालनेकरांची खड्डेमय रस्त्यातून होणार सुटका; आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नांना यश
- आईला फोन केल्यामुळे फरार कैदी पोलिसांच्या जाळ्यात अडकला
- आदित्य ठाकरेंच्या नावाने सरकारी योजना; मागासवर्गीय युवकांना मिळणार प्रशिक्षण
- जालना: ओपीडी सुरू, मात्र जिल्हा रुग्णालयाकडून ना प्रसिद्धिपत्रक, ना आवाहन; रुग्णांना मनस्ताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
